Video : कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पिंपरी महापालिका आयुक्तांनी केलं हे भावनिक आवाहन

Video : कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पिंपरी महापालिका आयुक्तांनी केलं हे भावनिक आवाहन

पिंपरी : "आपण बेजबाबदारपणे वागणार की स्वतःची काळजी घेणार?'' असा सवाल महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उपस्थित केला. स्वतःची काळजी घेतल्यास स्वतःसह घर व शहर सुरक्षित राहील, हे शहरातील प्रत्येक नागरिकावर अवलंबून आहे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. सध्या मृत्यूदर कमी करण्यालाच प्राधान्य दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आयुक्त हर्डीकर म्हणाले, "एकूण कोरोनाबाधित व्यक्तींपैकी 80 टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळले आहेत. 20 टक्के रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे आहेत. सध्या 30 जण व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर चोवीस तासात फक्त एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे.'' 

झोपडपट्टी, दाट लोकवस्तीत सर्वेक्षण सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी महापालिका ऍप व ज्येष्ठ नागरिक संघांची मदत घेतली जात आहे, असे सांगून आयुक्त म्हणाले, "दाट लोकवस्तीत सर्वाधिक रुग्ण आहेत. सध्या 12 हॉटस्पॉट आहेत. अधिक प्रसार होऊ नये, यासाठी तपासणीचे प्रमाण वाढविलेले आहे. त्यासाठी खासगी लॅबची मदत घेतली आहे. वायसीएमची लॅब सोमवारपासून सुरू होईल. सध्या दररोज सरासरी 650 स्वॅबची तपासणी केली जात आहे.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या रुग्णांकडे घरी स्वतंत्र खोलीची सोय आहे. त्यांना घरामध्येच आयसोलेशन करून उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यांच्याशी डॉक्‍टर वेळोवेळी संपर्कात राहतील किंवा रुग्ण व त्यांच्या नातेवाईक डॉक्‍टरांशी संपर्क साधू शकतील. खासगी रुग्णालये व हॉटेलमध्येसुद्धा आयसोलेशन होण्याची सुविधा उपलब्ध असेल. त्याबाबतचे दर निश्‍चित केले जातील. घरामध्ये आयसोलेशनचा कालावधी सतरा दिवसांचा असेल. तसेच, कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांनी विनाकारण फिरणे टाळावे. किमान पूर्णतः घरातच थांबायला हवे. यामुळे नवीन रूग्ण वाढणार नाहीत, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, मास्क न घालणाऱ्यांवर आरोग्य विभागामार्फत कारवाई सुरू आहे. त्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. त्यांच्या मदतीला पीएमपीकडील 825 कर्मचारी देण्यात आले आहेत. त्यातील 325 कर्मचारी आजपासून कर्तव्यावर हजर झाले असून, सोमवारपासून इतर कर्मचारी रूजू होतील. 

सध्या दहा ठिकाणी रुग्णांचे स्वॅब तपासणी केली जात आहे. एनआयव्ही, नारी, बीजे मेडिकल कॉलेज यांच्यासह आयसर, बिर्ला हॉस्पिटल, क्रष्णा डायग्नोस्टिक, वायरोप्ले, एसजी डायग्नोस्टिक, मेट्रोपोलिटीन डायग्नोस्टिक, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल या खासगी लॅबचीही मदत घेतली जात आहे. वायसीएममधील लॅब सोमवारपासून सुरू होणार आहे. तिची क्षमता दिवसाला 376 स्वॅब तपासणी इतकी असेल, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com