महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी महापालिकेतर्फे स्वच्छता अभियान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महापालिकेतर्फे महापौर उषा ढोरे यांनी अभिवादन केले.

पिंपरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महापालिकेतर्फे महापौर उषा ढोरे यांनी अभिवादन केले. तसेच, महात्मा गांधी जयंतीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आणि शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात महापालिकेच्या पदाधिकाऱ्यासह अधिकारी सहभागी झाले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या सॅम्पलिंग प्लॅन्टेशन ड्राईव्ह या उपक्रमाअंतर्गत नियोजित योगा पार्क, पिंपळे सौदागर येथे महापौर ढोरे यांच्या हस्ते शुक्रवारी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक विठ्ठल काटे, शत्रुघ्न काटे, हर्षल ढोरे, नगरसेविका निर्मला कुटे, शितल काटे, चंदा लोखंडे, माधवी राजापुरे सिमा चौघुले, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, पिंपरी-चिंचवड स्मार्ट लिमिटेडचे महाव्यवस्थापक अशोक भालकर, कार्यकारी अभियंता मनोज शेटीया, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

महापालिका भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस महापालिकेतर्फे महापौर ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक हर्षल ढोरे आदी उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या व्या जयंती निमित्त महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगवी परिसरात महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहीम उपक्रमात सहभाग घेतला व महापौर यांनी नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले. उपक्रमात नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Municipal Corporation celebrates the birth anniversary of Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri