pimpri Municipal Corporation update Flex at the place of action
pimpri Municipal Corporation update Flex at the place of action sakal

कारवाईच्या ठिकाणी पुन्हा उभारले फ्लेक्स

अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग्ज, किऑस्कवर महापालिकेकडून कारवाई सुरू

पिंपरी : अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग्ज, किऑस्कवर महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. ती अधिक तीव्र करण्यासाठी प्रशासनाने अन्य विभागातील कर्मचारी वर्ग केले आहेत. असे असले तरी, काही ठिकाणी नवीन प्लेक्स लावलेले जात आहेत, तर कारवाई झालेल्या ठिकाणी पुन्हा फ्लेक्स, किऑस्क दिसत आहेत. काही होर्डिंग्ज पदपथाच्या मध्येच असून काही होर्डिंग्जचे सांगाडे पदपथाच्या पलिकडे असले तरी, त्यांचे होर्डिंग मात्र रस्त्यावर आलेले आहेत. त्यामुळे फ्लेक्समुक्तीसाठी पहिले पाढे पंचावन्न अशी स्थिती आहे.

‘विद्रुपीकरणाचा उच्छाद’ असे वृत्त ‘सकाळ’ने एक एप्रिल रोजी प्रसिद्ध केले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने मुख्यालयासह आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या क्षेत्रात अनधित फ्लेक्स, होर्डिंग्ज, किऑस्क यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. मात्र, त्यानंतर दोन दिवसांनी त्या ठिकाणी पुन्हा किऑस्क व प्लेक्स दिसू लागले आहेत. डुडुळगाव ते मोशी रस्त्यावरील रस्ता दुभाजकातील विजेच्या खांबांवर नव्याने किऑस्क लावले असल्याचे रविवारी आढळले. पुणे-मुंबई महामार्गावर मोरवाडी चौकातील मेट्रो स्थानकाच्या पादचारी पुलाच्या कठड्यावर सुमारे चार मीटर रुंद व चाळीस मीटर रुंदीचा प्लेक्स लावलेला आढळला.

पिंपळे सौदागर येथील पदपथावरच एका होर्डिंग्च्या सांगाड्याचा खांब असून होर्डिंग पदपथावरून रस्त्यावरही आले आहे. अशीच स्थिती मोशा, डुडुळगाव परिसरातही आहे. त्यामुळे उंच वाहनांना अपघात होऊ शकतो. प्रशासक राजेश पाटील यांनी अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग्ज, किऑस्कवर कारवाई करण्यासाठी वर्ग करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये बांधकाम परवाना, करसंकलन, नागरवस्ती, पाणीपुरवठा आदी विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ३० एप्रिलपर्यंत हे सर्व कर्मचारी कारवाईसाठी वर्ग करण्याचे आदेशात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com