पिंपरी महापालिकेच्या वॉर रूममध्ये फोन आला, सूत्रे हलली अन् एकाचा जीव वाचला

पिंपरी महापालिकेच्या वॉर रूममध्ये फोन आला, सूत्रे हलली अन् एकाचा जीव वाचला

पिंपरी  : वार- शनिवार. तारीख- 23 मे. वेळ- दुपारी सव्वाएकची. ठिकाण- पिंपरी-चिंचवड महापालिका कोविड-१९ वॉर रुम. प्रसंग- नेहमीप्रमाणे प्रत्येक कर्मचारी आपापल्या कामामध्ये व्यस्त. घटना- पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या हेल्पलाईनचा दूरध्वनी खणखणला. कृती- वॉर रुममधील हेल्प-डेस्क टीममध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने तातडीने फोन उचलला. संवाद-पिंपरीतील शगून चौकामध्ये एक नागरिक बेशुद्ध होऊन पडला आहे. 

अन् असे जीवदान मिळाले...

फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने  सांगितले आणि फोन कट केला. दुपारच्या रखरखत्या उन्हात काही तरी विपरीत घडलंय याचा अंदाज घेऊन सूत्रे हलली. रहदारीच्या, गजबजलेल्या शगून चौकामध्ये नुकतीच बाजारपेठ सुरू झाल्यामुळे नेहमीप्रमाणे गर्दी होती. परंतु, कोरोना साथीमुळे मदतीसाठी कुणी पुढे आले नाही. तरीदेखील मानवतेच्या भूमिकेतून काही लोक बेशुद्ध पडलेल्या नागरिकाच्या आसपास जमले होते. ते थोड्या अंतरावर उभे होते. परंतु, सध्याच्या कोरोना साथीच्या धसक्यामुळे कुणीच पुढे होऊन मदत करण्याचं धाडस दाखवत नव्हते. अर्थात नागरिकांचे देखील बरोबरच होतं. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. नागरिकाचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. वॉर रूममध्ये फोन येईपर्यंत पंधरा मिनिटं सहज झाली असावीत. फोन आल्यानंतर इकडे वॉर रुममध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल  यांनी तातडीने हालचाल सुरु केली. एका क्षणाचाही विलंब करून चालणार नव्हते. तत्काळ सूत्रे हलली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वॉर रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी करणारे ओमप्रकाश बहिवाल यांनी लगेच सीसीटीव्हीच्या सहाय्याने घटनास्थळ गाठले आणि बेशुद्ध पडलेल्या नागरिकाला शोधून काढले. ही सर्व माहिती पोलिस विभागाला तत्काळ कळवण्यात आली. अवघ्या काही मिनिटांमध्ये पोलिस घटनास्थळावर पोहोचले. जमलेल्या नागरिकांना बाजूला करण्यात आले. देवदूत बनून आलेल्या पोलिसांनी बेशुद्ध पडलेल्या नागरिकाला काळजीपूर्वक वाहनामध्ये घेतलं आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलं. या नागरिकावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये आता या नागरिकाच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे.  
हा सगळा प्रसंग आज शहराने अनुभवला. आधुनिक तंत्रज्ञान आणि तत्पर प्रशासन यांच्यामुळे एकाचा प्राण वाचला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वॉर रूममुळे शक्य...

पिंपरी चिंचवड महापालिकेने सुरू केलेल्या कोविड-१९ वॉर रूममध्ये असे वेगवेगळे अनेक अनुभव येत आहेत. वॉर रूममुळे नागरिकांना संकटकाळी मदत मिळत आहे. कोरोना साथीच्या काळात वॉर रूममध्ये नागरिकांसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तत्पर सेवेमुळे हे शक्य होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com