
PCMC Elections
Sakal
पिंपरी : महापालिका निवडणूक ३१ जानेवारीपूर्वी होणार, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निश्चित झाले आहे. त्यानुसार महापालिकेत नवीन पदाधिकारी अवघ्या चार महिन्यांत मिळणार आहेत. या मध्ये आरक्षणानुसार पन्नास टक्के महिला असतील. शिवाय, खुल्या पन्नास टक्के जागांवरही महिलांना निवडणूक लढविता येणार आहे. त्या जागांवर विजयी झालेल्या महिलांमुळे सभागृहातील त्यांची संख्या वाढणार आहे.