Fri, June 2, 2023

जलतरण तलावात बुडून अभियांत्रिकीच्या तरूणाचा मृत्यू
Published on : 8 May 2022, 11:58 am
पिंपरी : मित्रांसोबत जलतरण तलावात पोहायला गेलेल्या अभियांत्रिकीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना आकुर्डी येथे घडली. कृष्णा क्षीरसागर (वय १९, रा. बॉइज् होस्टेल, निगडी, मूळ- नांदेड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कृष्णा हा अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत होता.
रविवारी (ता.८) सकाळी साडेआठच्या सुमारास तो त्याच्या मित्रांसोबत आकुर्डीतील छत्रपती जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी गेला होता. तेथे पोहत असताना तो पाण्यात बुडाला. बराच वेळ होऊनही बाहेर येत नसल्याने त्याचा शोध घेतला. त्याला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . निगडी पोलीस अधिक तपास करीत आहे