

Traffic Nightmare at Nigdi Lokmanya Tilak Chowk
Sakal
पिंपरी : शहरातील महत्त्वाच्या चौकांपैकी एक असलेल्या निगडीतील लोकमान्य टिळक चौकातून दररोज हजारो वाहनचालक प्रवास करतात. मात्र, सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले असून, त्यात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी काही मिनिटांचा प्रवास मोठ्या प्रतीक्षेचा बनत आहे.