पिंपरीत दुचाकी चोरट्याला अटक; चोरीच्या 4 टू व्हीलर जप्त

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 February 2021

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने एका सराईत चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. भूमकर चौक, वाकड येथे ही कारवाई केली.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने एका सराईत चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत. भूमकर चौक, वाकड येथे ही कारवाई केली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, विशाल विश्वनाथ कांबळे (वय 25, रा. काटेनगर, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह अल्पवयीन साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे पोलिस हिंजवडी परिसरात गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली होती. सांगवी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी भूमकर चौकात येणार आहेत. त्याच्याकडे असलेली दुचाकी देखील चोरीची असल्याचं समजलं होतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माहिती मिळाल्यानंतर युनिट चारच्या पोलिसांनी भूमकर चौकात सापळा लावून आरोपी विशाल कांबळे व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख 45 हजारांच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे पिंपरी, वाकड, हिंजवडी, कोथरूड पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी विशाल कांबळे याच्या विरोधात यापूर्वी दंगा, तोडफोड तसेच जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri one arrested in two wheeler theft case