
अविनाश ढगे
पिंपरी : संगणकावरील परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा संदेश आल्यानंतर उमेदवारांच्या आनंदाचे १२ तासांतच तीनतेरा वाजतात. पुन्हा शुल्क भरून चाचणी देण्यासाठी त्यांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक तयारी करावी लागते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विभागाने अशा धक्कातंत्राचा अवलंब केल्याची उदाहरणे दिवसागणिक वाढत आहेत.