पिंपरी : दर रविवारी बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवंदना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Babasaheb Ambedkar

पिंपरी : दर रविवारी बाबासाहेबांच्या पुतळ्याला मानवंदना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी ः भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्यावतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास रविवारपासून (ता.१४) दर रविवारी मानवंदना दिली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने या दर रविवारी दिल्या जाणाऱ्या मानवंदनेच्या कार्यक्रमाला परवानगी मिळावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने महापालिका आयुक्‍त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ, शहर व परिसतीाल विविध ठिकाणचे बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे, देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहार याठिकाणी दिनविशेषनुसार समता सैनिक दलाच्यावतीने मानवंदना दिली जाते; तसेच संचलनही केले जाते. याशिवाय भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका कार्यकारिणीच्या मागणीनुसार देखील शहर व तालुक्‍याच्याठिकाणी संचलन केले जाते.

हेही वाचा: 'जय भीम' IMDB च्या यादीत सर्वोच्च स्थानी; 9.6 रेटिंग

गेली दोन वर्षांपासून करोनाचा प्रादुर्भाव असल्याने, समता सैनिक दलाचे मानवंदना व संचलनाचे कार्यक्रम रद्द केले होते. मात्र, सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे खुली केली आहेत. याशिवाय नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरील निर्बंधदेखील शिथिल केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा (पश्‍चिम), पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी व समता सैनिक दलाच्यावतीने दर रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना देत, संचलन केले जाणार आहे. या परेडमध्ये समता सैनिक दलाचे सचिव, मेजर, डिव्हीजन ऑफिसर, युनिट लिडर व सैनिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ यांनी दिली.

loading image
go to top