esakal | पिंपरी : चिखलीत संचारबंदी दरम्यान दुकानं खुली; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

पिंपरी : चिखलीत संचारबंदी दरम्यान दुकानं खुली; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - प्रतिबंधात्मक आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता खुल्या ठेवलेल्या दुकानांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार चिखली येथे घडला आहे. याप्रकरणी दोन फळविक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मोहम्मद इरफान अब्दुल हन्नान बागवान (वय २४) आणि मोहम्मद इम्रान अब्दुल रहमान शेख (वय २२) दोघेही रा. राजवाडा चिखली, असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दिपक मोहिते यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा: कोरोना टेस्ट केलीये? रिपार्ट मिळाला नाही? मग, निरामयमध्ये राहा!

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत सायंकाळी सहानंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार पोलिसांचे पथक शुक्रवारी (ता. १६) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास चिखली-मोशी रोडवरील दुकानं बंद करत होते.

दरम्यान, फळवाले, हातगाडीवाले यांना जाण्यास सांगत असताना बागवान आणि शेख या दोन फळविक्रेत्यांनी पोलिसांना शिविगाळ आणि धक्काबुक्की केली. तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाणही केली, या मारहाणीत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.