esakal | पिंपरी : झोपडीधारकांना मिळणार स्वयंरोजगार । Pimpri
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : झोपडीधारकांना मिळणार स्वयंरोजगार

पिंपरी : झोपडीधारकांना मिळणार स्वयंरोजगार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : झोपडीधारकांचे पुनर्वसन करताना त्यांना केवळ भौतिक सुविधा न देता त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविण्याची तरतूददेखील सुधारित नियमावलीत करण्यात आली आहे. तीनशे चौरस फुटांचे मोफत घर देण्याबरोबरच त्यांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच हुशार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्चदेखील त्यातून उचलण्याची तरतूद या निमयावलीत करण्यात आली आहे.

हेही वाचा: वयाच्या 30 व्या वर्षात महिलांनी 'या' 5 सप्लीमेंट्स घ्याव्यात

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्ट्यांचा गतीने विकास व्हावा, यासाठी राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारित नियमवालीस नुकतीच मान्यता दिली आहे. या प्रारूप नियमावलीत झोपडीधारकांना २६९ ऐवजी ३०० चौरस फुटांच्या सदनिकेसह अनेक सवलती देऊ केल्या आहेत. एवढेच नव्हे, तर झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याबरोबरच त्यांचा व्यक्तिगत विकास कसा करता येईल, यावरदेखील या नियमावलीत तरतूद करण्यात आली आहे. पुनर्वसन प्रकल्पाच्या नियमावलीत अशा प्रकारची पहिल्यांदा तरतूद करण्यात आली आहे.

झोपडीधारकांच्या आरोग्याबरोबरच जीवनमान सुधारण्यासाठी समुपदेशन करण्यासाठी संस्थांची नेमणूक करण्याची तरतूद या नियमावलीत करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून झोपडीधारकांचे सामाजिक, आरोग्य यांच्यासह त्यांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हेही वाचा: निवडणूक निकाल आणि अर्थशास्त्राची फारकत...

त्यासाठी विकसकाकडून जमा होणाऱ्या देखभाल-दुरुस्तीच्या शुल्काच्या व्याजातून खर्च करण्यात येणार आहे. आर्थिक परिस्थितीमुळे हुशार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता येत नाही. अशा गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतदेखील या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे एसआरएचे मुख्यधिकारी राजेंद्र निबांळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. पुणे महापालिकेकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण घेऊन पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. त्याच धर्तीवर झोपडपट्टीतील अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

‘हरकती-सूचना दाखल करा’

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांसाठी तयार केलेल्या सुधारित नियमावलीच्या प्रारूपावर हरकती-सूचना दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यावर नागरिकांना २८ ऑक्टोबरपर्यंत हरकती-सूचना दाखल करता येणार आहेत. झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रकल्पांसाठी एसआरए प्राधिकरणाकडून सुधारित नियमावली तयार करण्यात आली आहे. या प्रारूप नियमावलीस राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यावर तीस दिवसांत हरकती-सूचना दाखल करण्यास मुदत दिली आहे. या मुदतीत नागरिकांनी गणेशखिंड रस्त्यावरील काकडे बीझ आयकॉन इमारतीतील चौथ्या मजल्यावरील कार्यालयात दाखल कराव्यात.

एसआरए प्रकल्पांची सद्यःस्थिती

५५७ पुणे-पिंपरी-चिंचवडमधील एकूण झोपडपट्ट्यांची संख्या

२८६ घोषित झोपडपट्ट्या

२७१ अघोषित झोपडपट्ट्या

२ लाख २६१ झोपडपट्टीतील एकूण घरे

१२ लाख एकूण रहिवासी

loading image
go to top