esakal | वयाच्या 30 व्या वर्षात महिलांनी 'या' 5 सप्लीमेंट्स घ्याव्यात I Balanced Diet
sakal

बोलून बातमी शोधा

Women Medicine

शरीर पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार (Balanced diet) महत्वाची भूमिका बजावतो.

वयाच्या 30 व्या वर्षात महिलांनी 'या' 5 सप्लीमेंट्स घ्याव्यात

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

शरीर पूर्णपणे निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार (Balanced diet) महत्वाची भूमिका बजावतो. दरम्यान, वयानुसार शरीराच्या गरजा देखील वाढत असतात. पोषणतज्ज्ञांच्या (Nutritionist) मते, महिलांनी 30 वर्षांच्या वयानंतर काही पूरक आहार घेणं आवश्यक आहे.

फोलिक अॅसिड (Folic acid)- पेशींच्या वाढीसाठी फोलिक अॅसिड खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही 30 वर्षांचे असाल किंवा गर्भधारणेचं नियोजन करत असाल, तर तुमच्या आहारात बी व्हिटॅमिन फोलिकचं प्रमाण वाढवा. त्याचे सप्लीमेंट्स कोणत्याही स्टोअरमधून खरेदी केले जाऊ शकतात.

आयरन (Iron) - वयाच्या 30 व्या वर्षी लोह हे देखील एक आवश्यक खनिज आहे. स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता जास्त असते. त्याच्या कमतरतेमुळं शरीर नेहमी थकल्यासारखं वाटतं. या व्यतिरिक्त, लोहाची कमतरता देखील संसर्गाची शक्यता वाढवते.

हेही वाचा: मुलांसमोर पालकांनी 'या' 5 गोष्टी चुकूनही करू नयेत

व्हिटॅमिन डी (Vitamin D) - व्हिटॅमिन डी अतिरिक्त कॅल्शियम शोषण्यास मदत करते. हे हृदयरोगास प्रतिबंध करते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. वयाच्या 30 वर्षांनंतर आपण व्हिटॅमिन डी पूरक प्रमाणात घेऊ शकता.

मॅग्नेशियम (Magnesium) - मॅग्नेशियम शरीरासाठी खूप महत्वाचं आहे, कारण ते शरीरात प्रथिने आणि हाडे मजबूत बनवण्यास मदत करते. तसेच रक्तातील साखर स्थिर ठेवते. मॅग्नेशियमची कमतरता असलेल्या महिलांना स्नायू, थकवा, मनःस्थिती विकार, उच्च रक्तदाब, अनियमित हृदयाचा ठोका, मळमळ आणि स्नायू कमकुवतपणाचा अनुभव येत असतो.

हेही वाचा: UPSC मुलाखतीला मिळालेत सर्वाधिक गुण; वाचा पहिला प्रश्न आणि उत्तर

प्रोबायोटिक्स (Probiotics) - प्रोबायोटिक्स हे उत्तम जिवाणू आहे, जे आतड्यांसाठी चांगले असतात. हे पूरक अतिसार किंवा IBS सारख्या पाचन समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात. प्रोबायोटिक्स अॅलर्जीपासूनही आपले संरक्षण करतात. तथापि, कोणत्याही प्रकारचा आहार घेण्यापूर्वी, एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर, तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

loading image
go to top