सोसायट्यांचे कचरा प्रकल्प पथदर्शी ; ओला व सुका कचरा विलगीकरणाला प्राधान्य

Pimpri Society waste project guide Preference for wet and dry waste segregation
Pimpri Society waste project guide Preference for wet and dry waste segregation

पिंपरी : शहरात मोठ्या सोसायट्यांमध्ये ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी "एरोबिक टाईप इनहाऊस कंपोस्टिंग' (वायू व्हिजन खत प्रकल्प) प्रकल्प राबविण्यात आला आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने सोसायट्यांसाठी हा "झिरो मेंटेनन्स' खत प्रकल्प पथदर्शी ठरत आहे.

कासारवाडीतील राधिका रेसिडेन्सी, दिघीतील सुमन सिल्क, केशर किंगडम, संत तुकारामनगर येथील स्वरगंगा, वाकडमधील पलाश, निगडीतील स्वप्ननगरी, पिंपळे गुरवमधील कुणाल रेसिडेन्सी या ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायटीमधील कचरा महापालिका उचलत नसल्याने हा प्रकल्प मुख्यत्वे राबविला जात असल्याने सोसायट्यांसाठी तो फायदेशीर ठरत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेचे निवृत्त सहायक आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे यांनीही आपल्या अनुभवातून सोसायट्यांसाठी हा प्रकल्प विकसित करण्यास मदत केली आहे. हा स्वस्त खत प्रकल्प अगदी छोट्या जागेत उभारला जात आहे. यापासून सोसायटीला सेंद्रीय खत मुबलक प्रमाणात मिळत आहे. पाच प्रकारच्या कचऱ्याचे अलगीकरण या सोसायट्यांमध्ये केले आहे. ई-वेस्ट, मेटल, कपडे यांस भाज्या व इतर ओल्या कचऱ्यासाठी लेबल लावून पाच बादल्या ठेवण्यात आल्या आहेत. 100 किलोच्या कचऱ्यातून 10 किलो खत मिळत आहे. त्यामुळे कचरा विलग करणे सोपे झाले आहे.

असे आहेत प्रकल्प
- कासारवाडीतील प्रकल्पासाठी राधिका मित्र मंडळाचे अनिल शर्मा, जयंत कारिया, सुनिल बेलवलकर यांनी पुढाकार घेतला. यापुढे सोसायट्यांच्या आवारात झाडे लावण्याचा संकल्पही केला आहे.
- राधिका सोसायटीत 130 प्लॅट आहेत. अर्धा गुंठे जागेत खत प्रकल्प उभारला आहे. त्यांना केवळ 14 हजार रुपये खर्च आला आहे. सोसायटीतून रोज 75 किलो कचरा जमा होतो. पालापाचोळा, भाज्या व इतर कचरा वेगवेगळा केला जातो. ओला व सुका कचरा बारीक केल्यानंतर कचरा ट्रेमध्ये वेगळा केला जातो. त्यानंतर पुन्हा विलगीकरण होते. कल्चरल पावडरनंतर कोकोपीठ (काथ्या) खतात मिसळले जाते. या प्रक्रियेनंतर कंपोस्टिंग खत मिळते. अतिशय सुलभ व सोपी प्रक्रिया असल्याने पुन्हा खर्च येत नाही. परिणामी या सर्व सोसायट्यांना मिळकतकरामध्ये सवलत मिळाली आहे.


वचननाम्यात दिलेला शब्द शिवसेनेनं पाळला नाही; 'आप'ने केली सेनेच्या वचननाम्याची होळी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com