वचननाम्यात दिलेला शब्द शिवसेनेनं पाळला नाही; 'आप'ने केली सेनेच्या वचननाम्याची होळी

AAP_Shivsena
AAP_Shivsena

औंध : विधानसभेच्या निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यात वीजदरात ३०% टक्के कपात करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु वीजदर कमी न करता उलट राज्य सरकारने १ एप्रिलपासून हे दर वाढवून वचननाम्यात दिलेल्या शब्दाची शिवसेनेने वचनपूर्ती केली नाही. त्यामुळे आम आदमी पक्षाकडून औंध येथील इंदिरा वसाहतीत या वचननाम्याची होळी करण्यात आली.

लॉकडाउन काळातील बिलामध्ये दिवाळीपूर्वी सवलत देऊ असे सांगणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही आता यू-टर्न घेतला आहे. निवडणुकीत जनतेच्या अस्मिता जाग्या करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जप करणाऱ्या शिवसेनेने आणि महाविकास आघाडीने फसवी भूमिका घेऊन जनतेसोबत लबाडी केल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला आहे. शिवराय दुष्काळ किंवा कुठल्याही अस्मानी संकटांच्या वेळी प्रजेची काळजी घेत असत, त्यांना दिलासा मिळेल असे निर्णय घेत होते, उद्धव ठाकरे मात्र नेमकी उलटी भूमिका घेत असल्याची टीका आंदोलनादरम्यान आपच्या वतीने करण्यात आली.

कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारी आणि मंदीची कुऱ्हाड कोसळली असताना लॉकडाउन काळातील अवाजवी अतिमहागड्या विजबिलात माफी किंवा सवलत न देण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखाच असून त्याची प्रतिक्रिया आता शहरातील वस्ती पातळीवर दिसू लागल्याचे आपकडून सांगण्यात आले. जोपर्यंत राज्य सरकार हा तुघलकी निर्णय मागे घेत नाही आणि दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकार प्रमाणेच राज्यातील नागरिकांना दोनशे युनिटपर्यंत वीज माफी देत नाही, तो पर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असे आपचे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी या वेळेस सांगितले.

आम आदमी पार्टीच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या आंदोलनात स्थानिक महिलांनी शिवसेनेच्या 'वचननाम्या'ची होळी केली आणि सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी विकास लोंढे, रोहित घडसिंग, दीपक शिंदे, ईश्वर तुजारे, संजय वाघमारे, निलाबाई दगडे, मंगल तुजारे, राईबाई तुजारे, सरस्वती जाधव, सतीश यादव, अमोल बगाडे, विक्रम गायकवाड, सादिक अली सईद, प्रकाश जाधव, पप्पू रवेलीया यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com