
पिंपरी - नववर्षाच्या सुरुवातीच्या सात दिवसांत पुणे मेट्रोच्या प्रवाशांची संख्या पाच लाखांवर गेली आहे. मेट्रो प्रवासाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामधून या सात दिवसांत ८५ लाखांवर मेट्रोचे उत्पन्न झाले आहे. स्वारगेटपर्यंत मेट्रो झाल्याने नागरिकांना प्रवास करणे सोपे झाले आहे.