

Illegal Sale of 15 Acre Govt. Land in Tathawade
Sakal
पिंपरी : ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या १५ एकर ३२ गुंठे शासकीय जमिनीची परस्पर खरेदी-विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विभागाने पोलिसात तक्रार दिल्यानंतर दस्तनोंदणी करणाऱ्या सह दुय्यम निबंधकासह जागेची खरेदी-विक्री करणाऱ्या २६ जणांवर दापोडी पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.