esakal | पिंपरी : शहरात सामाजिक संघटनानी केला शिक्षक दिन साजरा
sakal

बोलून बातमी शोधा

teachers day

पिंपरी : शहरात सामाजिक संघटनानी केला शिक्षक दिन साजरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : प्रतिभा महाविद्यालय चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी ऑनलाइन प्राध्यापकांबरोबर संपर्क साधून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुऱ्हाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, संचालक डॉ. सचिन बोरगावे, मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हिस आदींनी यात सहभाग घेतला. कमला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बी.एड. विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीनी प्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, प्रा. मनिषा पाटील, डॉ. सुवर्णा गायकवाड, प्रा. सुनील भोंग, डॉ. संतोष उमाटे, प्रा. अस्मिता यादव आदींच्या उपस्थितीत बी.एड.च्या विद्यार्थिनी वृषाली पोतदार, पल्लवी जाधव, गुलअफरोज शेख, सुप्रिया प्रभुणे, मनिषा कांबळे, बिंदू अंजिव, सुचिता उन्हाळे, सायली खरखडे यांनी केक कापूर शिक्षक दिन साजरा केला. हैदराबाद विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे तज्ज्ञ डॉ. मुरली बनावत यांनी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा: एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या विक्रमाची गिनीज बुकमध्ये झाली नोंद

श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन कनिष्ठ महाविद्यालयात विविध ऑनलाइन कार्यक्रम घेतले. ॲड. राजेंद्रकुमार मुथा व संस्थेचे सहाय्यक सेक्रेटरी प्रा. अनिल कांकरिया यांनी सर्व शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्या सुनीता नवले, उपप्राचार्य अनिल गुंजाळ उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक स्वाती आंधळे, भूषण देशपांडे , सचिन वाबळे, सविता लवांदे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सिद्धार्थ गुगळे आणि अडतरे सिद्धीया विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सविता जाधव यांनी केले. नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनीता नलगे, स्वाती आंधळे यांनी केले.

घरोघरी जाऊन सन्मान

शिवराज लांडगे आणि आमराई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने इंद्रायणी नगर परिसरातील शिक्षकांचा घरोघरी जाऊन सन्मान करण्यात आला. परिसरातील तब्बल १७६ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रत्येक शिक्षकाच्या घरी जाऊन सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

हेही वाचा: महसूल विभाग देशात पहिला, लिम्का बुकमध्ये झाली नोंद

यादव यांचा सत्कार

महापालिकेच्या प्राथमिक शाळा क्र.९३ सोनवणेवस्ती या शाळेतील डिजिटल उपशिक्षक दयानंद यादव यांचा सत्कार केला. मनपा शिक्षण विभाग अंतर्गत कोविडकाळात तसेच शैक्षणिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कामकाजाची दखल घेण्यात आली.

भोसरीत शिक्षकांचा सन्मान

गायत्री सखी मंचाच्यावतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यात भोसरी परिसरातील प्रियदर्शनी स्कूल, सिद्धेश्‍वर स्कूल, श्रीराम विद्यालय, श्रमजीवी विद्यालय, सेठ रामधारी अग्रवाल विद्यालय, संत ज्ञानेश्‍वर विद्यालय, न्यू इंग्लिश मीडियम विद्यालय, ज्ञानसागर विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापकांचे कौतुक केले. यावेळी गायत्री सखी मंच अध्यक्षा कविता कडू, पुष्पलता आढाव, रोहिणी पाटील, मुख्याध्यापक श्रीकांत रहाणे उपस्थित होते.

loading image
go to top