Pimpri Traffic: मेट्रो कामामुळे रस्त्यासह थांबाही अरुंद; विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास
Metro Construction: पिंपरी ते चिंचवड मार्गावर मेट्रो कामामुळे पादचारी रस्त्याची रुंदी कमी झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. रिक्षा चालकांचे अनियंत्रित थांबणे आणि अरुंद रस्ते यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पिंपरी : आकुर्डी ते चिंचवड दरम्यान शाळा आणि कॉलेज आहेत. त्यामुळे या मार्गावरुन विद्यार्थी आणि पालकांची वर्दळ असते. मेट्रो कामासाठी निगडी पवळे पूल ते चिंचवडपर्यंत पादचारी रस्त्याची रुंदी कमी करून सेवा रस्ता रुंद केला.