
पिंपरी : शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून प्रवास करणाऱ्या खासगी प्रवासी बससाठी वाहतूक पोलिसांनी ठरावीक मार्ग निश्चित केले आहेत. प्रवासी घेण्याचे व सोडण्याचे थांबेही ठरले आहेत. यानंतरही खासगी बस कोणत्याही मार्गांवरून धावतात, प्रवासी घेण्यासाठी-उतरविण्यासाठी जागा मिळेल तेथे थांबतात. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढते.