esakal | पिंपरी : ‘ऑनलाइन’बाबत शिक्षकांना प्रशिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

online education

पिंपरी : ‘ऑनलाइन’बाबत शिक्षकांना प्रशिक्षण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेच्या सर्व शिक्षकांना गुगल क्लासरुम, मायक्रोसॉफ्ट टिम्स, झूम, व्हॉट्‌सॲपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी ग्लोबल एज्युकेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी सोल्युशन्स संस्थेला प्रतिशिक्षक दोन हजार रुपये दिले जाणार आहे. यासाठी येणाऱ्या दहा लाख रुपये खर्चास स्थायी समिती सभेने बुधवारी मान्यता दिली.

महापालिका स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी नितीन लांडगे होते. यावेळी सद्‌गुरुनगर, भोसरी येथील तलावात बुडणाऱ्या मुलांना वाचविणाऱ्या आयुष तापकीरचा गौरव केला. त्याची ‘राष्ट्रपती बाल शौर्य’ पुरस्कारासाठी शिफारस महापालिकेतर्फे केली जाणार आहे. बैठकीबाबत लांडगे म्हणाले, ‘‘विविध प्रकारच्या ३१ विकास कामांसाठी पाच कोटी ६३ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. यात ऐनवेळच्या नऊ विषयचा समावेश होता. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. मात्र, तांत्रिक बाबींची पूर्ण माहिती अनेक शिक्षकांना नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडथळे येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शिक्षकांना तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात गुगल क्लासरुम, मायक्रोसॉफ्ट टिम्स, झूम, व्हॉट्‌सॲपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण आदी विषयांचा समावेश आहे. यासाठी ग्लोबल एज्युकेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी सोल्युशन्स संस्थेला प्रतिशिक्षकाप्रमाणे मानधन दिले जाणार आहे. त्यासाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.’’

हेही वाचा: शहांची भेट कशासाठी? अमरिंदर सिंगांनी केला खुलासा; म्हणाले, "अमित शहा..."

घंटागाडी कर्मचाऱ्यांना ४० हजार

महापालिका आरोग्य विभागंतर्गत तीनशेहून जास्त घंटागाडी कर्मचारी आहेत. त्यांनीही कोरोना काळात काम केले असून त्यांना दिवाळी भेट म्हणून ४० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली.

घटांगाडी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

वर्षे / रक्कम (हजारात)

  • २०१८-१९ / २०

  • २०१९-२० / ३०

  • २०२०-२१ / ४० (प्रस्तावित)

loading image
go to top