नागरीकांच्या हिताचे व मुलभूत प्रश्‍नांचे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shekhar Sinh

Shekhar Sinh : नागरीकांच्या हिताचे व मुलभूत प्रश्‍नांचे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेत माजी आयुक्त व प्रशासक राजेश पाटील व माझ्या अशा एकूण एक वर्षभराच्या काळात आम्ही नागरीकांच्या हिताचे व मुलभूत प्रश्‍नांचे विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सोमवारी (ता. १३) सांगितले.

शेखर सिंह म्हणाले की, आंद्रा धरणाचे १०० एमएलडी पाणी आणून चिखली येथील शुध्दीकरण प्रकल्प पुर्ण केला. भक्ति शक्ती चौक ते मुकाई चौक बीआरटीएस रस्त्याचे काम मार्गी लावले. पिंपरीतील डेअरी फार्म येथील उड्डानपूलाचे काम मार्गी लावले. महापालिकेच्या नवी इमारतीचा विषय मंजूर केला. वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प मार्गी लावला.

उद्योनगर असल्याने शहरातील उद्योगांसाठी सीएसआर कक्ष व उद्योग सुविधा कक्ष सुरु केला. तृतीयपंथीयांसाठी महापालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी दिली, त्यांच्यासाठी विविध उप्रकम राबविले. महिला बचत गटांना स्वंयरोजगार देण्यासाठी नवी दिशा उपक्रम सुरु केला. शहराच्या सुशोमिकरणासाठी शिल्प उभे केले. शिक्षणाचा जल्लोष उपक्रम राबविला. आंतररराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्र सुरु केले.

विज्ञान केंद्रात तारांगण उभारणी केली. शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्टीक वाहनांना प्रोत्साहन देण्याकरता इव्ही चार्जींग स्टेशनव वाहनांचे धोरण आणले. मासुळकर कॉलनीत डोळ्यांचे रुग्णालय उभे केले. कै. अटल बिहारी वाजपेयी उद्यानाची उभारणी केली. यांत्रिकी पध्दतीने साफसफाईचे काम सुरु केले. ओला व सुका कचऱ्याचे विलगीकरणाचे ९० टक्के पुर्णत्वास आणले, अशी माहिती सिंह यांनी दिली.