esakal | पिंपरी : तरुणाची दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक । Fraud
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : तरुणाची दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक

पिंपरी : तरुणाची दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : अज्ञात व्यक्तीने ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून तरुणाच्या बँक खात्यातून सव्वादोन लाख रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना चिंचवडगाव येथे घडली. याप्रकरणी रविराज सतीश कर्णे (रा. चिंचवडगाव, पुणे) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे योनो ॲप्लिकेशन चालत नसल्याने त्यांनी ऑनलाइन कस्टमर केअर नंबर शोधला. त्यावर फोन केला असता अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांना ॲनडेस हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

हेही वाचा: वयाच्या 30 व्या वर्षात महिलांनी 'या' 5 सप्लीमेंट्स घ्याव्यात

दरम्यान, फिर्यादी यांनी त्याच दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या बँकेतील बॅलन्स तपासला असता बँक खात्यात केवळ दहा रुपये शिल्लक असल्याचे समोर आले. बँकेत चौकशी केली असता त्यांना समजले की, त्यांच्या सेव्हिंग अकाउंटवरील व फिक्स डिपॉझिटवरील लोन केलेले पैसे दोन खात्यांवर ट्रान्स्फर झाले आहेत. तसेच एटीएममधून देखील वीस हजार रुपये काढण्यात आले.

अशाप्रकारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून एकूण दोन लाख २७ हजार ५५० रुपये काढून घेत अज्ञात आरोपीने फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top