जुनी सांगवी : पावसामुळे भाजी विक्रेत्यांची फरफट

स्थलांतर,कारवाईचा बडगा व धुळखात पडून असलेली भाजी मंडई
पावसामुळे भाजी विक्रेत्यांची फरफट
पावसामुळे भाजी विक्रेत्यांची फरफटSakal
Updated on

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील भाजी विक्री व भाजी विक्रेते यांची फरफट सुरू आहे. रस्त्यावर होणा-या भाजी विक्री वर एकीकडे कारवाईचा बडगा तर एकीकडे बंद असलेली ७६ गाळ्यांची भाजी मंडई गेली चार वर्षांत तीन ठिकाणी भाजी विक्रेत्यांच्या जागेची व्यवस्था करण्यात आली मात्र काही दिवस भाजी मंडई सुरू करून पुन्हा बंद पडल्याने भाजी विक्रेते व प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाच्या अभावाने भाजी मंडई सुरू करण्याचे प्रयत्न सपशेल फेल गेल्याने मंडईच्या बाजूच्या मैदानावर भाजी विक्रेत्यांची व्यवस्था करण्यात आली. येथेही अर्धवट पेव्हींग ब्लॉक कामामुळे पावसाच्या पाण्याचे तळे साचून ग्राहक व भाजी विक्रेते व नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भाजी विक्रेत्यांची संख्या व गाळे यात मेळ बसत नाही.यातच बाहेर फेरीवाल्यांमुळे मंडईत धंदा होत नसल्याचे कारण सांगत भाजी विक्रेते भाजी मंडईत स्थलांतर करत नाहीत.सध्या सांगवी येथे श् गजानन महाराज मंदिरा समोर तात्पुरत्या भाजीमंडई असलेल्या मैदानामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे मंडईतील सर्वच व्यापारी यांना मोठ्या प्रमाणावर अडचण होत असून पावसामुळे रोजच्या रोजीरोटी वर सुद्धा विपरीत परिणाम होत आहे.

पावसामुळे भाजी विक्रेत्यांची फरफट
पुणे : शासनाने खरेदी खताची नोंदणी प्रक्रीया सुरू करावी; नागरिकांची मागणी

त्यातच या मैदानात महानगरपालिकेने बसविलेले काँक्रीट पेव्हींग ब्लॉक अर्धवट असल्याने मोठा खोळंबा झाला आहे. मैदानात पाणी साचत असून करसंकलन कार्यालय ,शाळा, मैदान, ज्येष्ठ नागरिक संघ, कोरोना लसीकरण केंद्र, आरोग्य विभाग ,विद्युत विभाग या सर्वच सुविधांना अडचण होत आहे.

गेली अनेक वर्षे सांगवी भाजीमंडई चा प्रश्न जैसे थे आहे.मध्यतंरीच्या काळात मंडईची डागडुजी करून मंडई सुरू करण्यात आली मात्र पुन्हा ती बंद पडली. कधी कारवाईचा बडगा तर कधी स्थलांतर यामुळे भाजी विक्रेत्यांची फरपट होत आहे.तर सध्या आहे त्याच ठिकाणी विक्री करू द्यावी.असे भाजी विक्रेत्यांच्या तगमग आहे.

मात्र ऊन वारा, पावसात हातगाड्यांवर छत्री लावून भाजी विक्रेते मैदानावर विक्री करत आहेत.अर्ध्या मैदानावर भाजी विक्रेत्यांसाठी पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले आहेत.तर अर्ध्या रिकाम्या भागात अवकाळी पावसामुळे पाणी साचले होते.यामुळे समोरच असलेले करसंकलन,शाळा,लसिकरण केंद्र आदी कार्यालयात ये जा करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत होती.स्थापत्य विभागाकडून येथे पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ खोदकाम करून पाईप टाकण्यात आले.

पावसामुळे भाजी विक्रेत्यांची फरफट
पुणे : शहरावर पहाटेच्या धुक्याची झालर; पहा फोटो

तात्काळ येथील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चेंबर व पाईप टाकण्यात आले आहेत. -सचिन मगर अभियंता स्थापत्य.

सोमवार पासून भाजी विक्रेते स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून भाजी मंडईत स्थलांतर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

-विजय थोरात ह प्रभाग अधिकारी.

एक तर दोन वर्षांपासून संकटाचा काळ आहे.केवळ रस्त्यावर अतिक्रमण होते म्हणून वारंवार हातगाड्या उचलून कारवाई करणे म्हणजे एक प्रकारे त्यांची रोजीरोटी हिसकावल्यासारखे आहे. त्यापेक्षा त्यांना योग्य ठिकाणी मुलभूत सुविधा पुरवाव्यात.

-प्रशांत शितोळे माजी नगरसेवक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com