पिंपरी : ‘वायसीएम’मध्ये आता बीएस्सी नर्सिंग कॉलेज

सध्या बहुमजली पार्किंग इमारतीत प्रारंभ
पिंपरी : वायसीएम कॉलेज
पिंपरी : वायसीएम कॉलेजsakal

पिंपरी : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) पदव्युत्तर संस्था (पीजी) उभी राहिली, त्याच धर्तीवर आता बीएस्सी नर्सिंग कॉलेजही लवकरच उभे राहणार आहे. ‘वायसीएम’मध्ये सुरू असलेल्या बहुमजली पार्किंग इमारतीत तूर्तास नर्सिंग कॉलेज सुरू करण्याच्या प्रस्तावास महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी बैठकीत मान्यता दिली आहे.

‘वायसीएम’च्या आवारात गेल्या कित्येक दिवसांपासून पार्किंगच्या इमारतीचे कामकाज सुरू आहे. यातील पाच मजल्यापैकी दोन मजले किंवा गरज पडल्यास अधिक मजल्यावर कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या पाच मजल्यावर यापूर्वी रुग्णांच्या नातेवाइकांसाठी राहण्याची सोयदेखील केली जाणार होती. सध्या पीजी संस्थेमुळे डॉक्टर उपलब्ध झाले असले तरी काही अंशी नर्सिंग मनुष्यबळाची गरज निर्माण झाली होती. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाच्यावतीने पावले उचलली जाऊन, रुग्णांसाठी हा घटक महत्त्वाचा ठरणार आहे.

पिंपरी : वायसीएम कॉलेज
पिंपरी-चिंचवड शहरात आज ६९ केंद्रांवर लसीकरण

महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ आणि महाराष्ट्र शासनाकडे नर्सिंग कॉलेजचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. परंतु, पार्किंग परिसरात जागेचा अभाव निर्माण होईल तसेच पार्किंगसाठी देखील पुरेशी जागा मिळणार नाही. त्यासाठी ‘वायसीएम’मध्ये असलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या मागे दोन एकर जागा आहे. जी बेघरांसाठी राखीव ठेवली आहे. या जागेत नर्सिंग कॉलेज झाल्यास ‘वायसीएम’साठी फायद्याचे ठरणार आहे. परंतु, अद्याप या जागेविषयी कोणतीही निश्चित धोरण आखण्यात आलेले नाही. पार्किंग इमारतीत क्लासरूम, लायब्ररी व अत्याधुनिक साधन सामग्री उभी केली जाणार आहे. चार वर्षांचा हा कोर्स कालावधी असेल. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना करिअर घडविण्याची संधी मिळणार आहे.

सद्यस्थीती

६० - प्रवेश संख्या क्षमता

५० - पॅरामेडिकल टेक्निशियन

प्रवेश संख्या

पॅरामेडिकल टेक्निशियन कोर्सेसही नर्सिंगसमवेतच पॅरामेडिकल टेक्निशियन याअंतर्गत ३५ ते ४० टेक्निकल कोर्सेस आहेत. यामध्ये लॅब टेक्निशियनपासून एक्स रे टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, ॲनेस्थिशिआ, आयसीयू व सीएसएसडी टेक्निशियनचे प्रशिक्षण मिळेल. यामुळे रोजगाराची नव्याने संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

कोरोनासारख्या परिस्थितीनंतर मनुष्यबळाची कमतरता भासते. पदव्युत्तर संस्थेप्रमाणेच नर्सिंग कॉलेज उभे राहिल्यास रोजगाराची संधी निर्माण होऊन ताण हलका होण्यास मदत होईल.

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com