आरटीई नोंदणीस शाळांचा "ठेंगा' 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 February 2021

गेल्यावर्षी शहरातील 176 शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केली होती. यावर्षी मात्र सुरवातीलाच पिंपरी विभागांतर्गत 13 तर आकुर्डी विभागांतर्गत फक्त 5 शाळांनी नोंदणी केली आहे.

पिंपरी - दुर्बल, वंचित व दिव्यांग घटकातील बालकांना नामांकित खासगी शिक्षण संस्थेत 25 टक्के कोट्यातून मोफत प्रवेश देण्यास शाळांनी ठेंगा दाखवला आहे. 21 जानेवारीपासून शाळा नोंदणीला सुरवात असून आजअखेरच्या 14 दिवसांत अवघ्या 18 शाळांनी नोंदणी केली आहे. नोंदणीबाबत शाळांची उदासिनता पाहून शिक्षण संचलनालयाने नोंदणीला 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याने पालकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्यावर्षी शहरातील 176 शाळांनी आरटीईसाठी नोंदणी केली होती. यावर्षी मात्र सुरवातीलाच पिंपरी विभागांतर्गत 13 तर आकुर्डी विभागांतर्गत फक्त 5 शाळांनी नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारीला अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रवेश अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे, यासाठी प्रशासनाने मुख्याध्यापकांची बैठक घेतली, त्यात नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. तरीही शाळांचा प्रतिसाद दिसून येत नाही. यामुळे आता यावर्षी किती शाळांची नोंदणी होणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. 

शेतकरी आंदोलनाच्या झळा आंतरराष्ट्रीय पातळीवर; रिहानाच्या ट्विटनंतर मोदी सरकारचं भलं मोठं उत्तर​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimprichicnwad news RTE registration for schools

Tags
टॉपिकस
Topic Tags: