तळेगाव दाभाडेत दोनशे वृक्षांची लागवड

तळेगाव दाभाडेत दोनशे वृक्षांची लागवड

तळेगाव दाभाडे, ता. ५ ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यावतीने बुधवारी दोनशे झाडांची लागवड करण्यात आली. तसेच जुना पुणे-मुंबई महामार्गालगत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव स्टेशन येथील तळे, पुणे-मुंबई महामार्गालगत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, विशाल मिंड, विजय शहाणे, सिद्धेश्वर महाजन, वीरेंद्र नारगुंडे, मनिषा चव्हाण, प्रमोद फुले, तुकाराम मोरमारे, विभा वाणी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘पर्यावरण व्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देता व प्रदूषणविहित पर्यावरण राखून मानवाचे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो. या अनुषंगाने आपण सर्वांनी पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून पर्यावरणाचा समोल राखावा.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com