प्लाझ्मादात्यास महापालिका देणार २००० रुपये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Plasma

प्लाझ्मादात्यास महापालिका देणार २००० रुपये

पिंपरी - महापालिकेच्यावतीने प्लाझ्मादान (Plasma Donate) करणाऱ्या व्यक्तीस प्रोत्साहनपर रक्कम रुपये दोन हजार प्रति व्यक्ती देण्यास तसेच याकामी येणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने (Standing Committee) बैठकीत मान्यता (Recognition) दिली. यासह महापालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध विकास कामासाठीच्या सुमारे ३५ कोटी ३५ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली. (Plasma Donar 2000 Rupees Paid by Municipal)

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची ऑनलाइन पद्धतीने झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. तसेच पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकडे प्लाझ्मा मागणी करणाऱ्या इतर महापालिका हॉस्पिटल व सरकारी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी व खासगी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी अफेरेसीस प्लाझ्मा बॅग्जसाठी रक्त व रक्तघटक अफेरेसीस प्लाझ्मा बॅग्जसाठी शुल्क न आकारता मोफत देण्यास मान्यता देण्यात आली. दापोडी सुंदरबाग येथे अद्ययावत पद्धतीने रस्ता विकसित करण्याकामी दोन कोटी ८१ लाख, कासारवाडी शास्त्रीनगर मधील विसावा हॉटेलपर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्यासाठी तीन कोटी ४७ लाख तर शितळादेवी ते दफनभूमीपर्यंतचा रस्ता अद्ययावत पद्धतीने विकसित करण्याकामी तीन कोटी ४० लाख खर्च केले जाणार आहेत. महादेवनगर, सदगुरुनगर, लांडगेवस्ती व परिसरात पेव्हींग ब्लॉकची सुधारणा करण्याकामी ३० लाख ३५ हजार, चक्रपाणी वसाहत, देवकर वस्ती व परिसरात पेव्हींग ब्लॉकची सुधारणा करण्यासाठी ३० लाख ४२ हजार, तर पुणे नाशिक रस्त्याच्या पश्चिम भागात पावसाळी गटरची सुधारणा करण्याकामी ३१ लाख १२ हजार खर्च होणार आहेत. ‘ग’ प्रभागातील स्मशानभूमीमध्ये गॅस/विद्युत वाहिनी बसविणे या कामासाठी ७६ लाख ५९ हजार खर्च केले जाणार आहेत.

नागरिकांना वैद्यकीय सेवा व सुविधा देण्यासाठी मौजे भोसरी येथील मंजूर विकास आराखड्यातील आरक्षित जागेत ‘दवाखाना व प्रसूतिगृह आणि ग्रंथालय’ यासाठी ४० गुंठे क्षेत्रावर हॉस्पिटल विकसित करण्यात येणार आहे. मौजे भोसरीतील रुग्णालयाच्या पूर्वेकडील बाजूच्या मोकळ्या निवासी जागेत महापालिकेच्या ऑक्सिजन प्लॅन्टसाठी ८० लाख ३९ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

हेही वाचा: पिंपरी-चिंचवडमध्ये ७१६ नवीन रुग्ण; आठ रुग्णांचा मृत्यू

रेमडिसिव्हिर इंजेक्शनच्या गैरवापराची होणार तपासणी

शहरातील खासगी रुग्णालयात रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा गरज असलेल्या रुग्णांसाठी वापर होतो? त्याचा अनावश्यक वापर तर होत नाही ना? रुग्णालयांमध्ये प्राप्त झालेल्या रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा साठा व वापर किती? यासह रुग्णालयातील वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी करून अनियंत्रित वापर करणाऱ्या रुग्णालयांवर नियमानुसार कारवाई होणार आहे,असे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

महापालिकेने सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथकाची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत रुग्णालयांना अचानक भेटी देवून रेमडिसिव्हिर इंजेक्शनबाबतची तपासणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय स्मशानभूमीमध्ये कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांचे पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. अशा आशयाचा फलक स्मशानभूमीच्या दर्शनी भागावर लावण्याची कार्यवाही क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी यांनी करावी. मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांकडे पैशाची मागणी करणे, अथवा तशा तक्रारी येऊ नयेत यासाठी महापालिकेच्या सुरक्षा विभागाने अचानक गस्त घालून पाहणी करावी. अशा पद्धतीचे गैरकृत्य करताना आढळून आल्यास अथवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश महापलिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

loading image
go to top