
माळशिरस : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्रत्यक्षात बाजारपेठांमध्ये प्लॅस्टिक आणि कापडी फुलांच्या माळांचा सुकाळ पाहायला मिळत आहे. बंदी केवळ कागदावरच मर्यादित राहिली असून, नैसर्गिक फुलांचे उत्पादन करणाऱ्या शेडनेट व पॉलिहाउस शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.