
रावेत : रावेत परिसरातील प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) २ साठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील ९३४ लाभार्थ्यांना घरे मिळाली नसल्याने निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. त्यांना किवळे येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.