
PMC Schools
Sakal
पिंपरी : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी यशाची उत्तुंग भरारी घेत आहेत. राष्ट्रीय विज्ञान उपक्रम असतील, भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) भेट, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, शाळांना मिळालेले ‘आयएसओ’ मानांकन, इंग्रजी माध्यमातून शिक्षण, दहावीसह विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश, विद्यार्थ्यांचे समुपदेशन, नावीन्यपूर्ण उपक्रम, सुरक्षित वातावरण आदी कारणांमुळे महापालिका शाळांमध्ये मुलांना दाखल करण्याकडे पालकांचा कल वाढल्याचे दिसत आहे.