पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) पर्यटन बससेवेला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच आणखी एका पर्यटन बस सुरू करण्यात आली. पुणे-लोणावळा या मार्गावर ही सेवा सुरू झाली. प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे पर्यटन बस सेवा सुरू झालेला हा अकरावा मार्ग आहे.