

PMPML Bus Accidents Continue Despite Driver Training
Sakal
अविनाश ढगे
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसचे वाढते अपघात लक्षात घेता प्रशासनाने ड्रायव्हिंग प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेमार्फत (आयडीटीआर) स्वमालकीच्या आणि ठेकेदारांच्या बसच्या चालकांना विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार चालकांना प्रशिक्षण मिळाले आहे. यावर प्रति चालक एक हजार ४०० रुपयांनुसार ४८ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. यानंतरही जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ‘पीएमपी’ बसचे ४५ अपघात झाले आहेत. यात २४ जणांचा मृत्यू आणि १७ जण गंभीर जखमी झाले आहेत.