
पिंपरी : एकीकडे पीएमपी बस प्रवाशांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी झाडांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, दुसरीकडे पीएमपी प्रशासनाने सेवा रस्त्यावरून बस धावत नसतानाही लाखो रुपये खर्चून नवीन स्टेनलेस स्टीलचे निवारा शेड उभारल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, तब्बल १५ महिन्यांनंतर प्रशासनाला अखेर शहाणपण सुचले असून, त्यांनी आता बस शेड काढण्यास सुरुवात केली आहे.