
पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडून (पीएमपीएमएल) चऱ्होली आणि हिंजवडी फेज दोन येथे ई बस डेपो होणार आहे. यामधून ९५ ई बस सोडण्याचे नियोजन प्राथमिक टप्प्यात आहे. या ठिकाणी लवकरच ई-बस डेपो कार्यान्वित होणार आहे. या बस सुरू झाल्यास दोन्ही भागातील नागरिकांची गैरसोय देखील दूर होणार आहे.