

PMPML Security Lapses Exposed at Pune Bus Depots Despite Crores in Spending Guards and CCTV Are Still Missing
sakal
-अविनाश ढगे
पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलिस दलातील कर्मचारी विजय कोळी यांनी पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह २६ सप्टेंबर रोजी निगडी ट्रान्सपोर्टनगर येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) आगाराच्या इमारतीमागे आढळला; पण कोळी हे बस डेपोत गेल्याची नोंद पीएमपीच्या सुरक्षा रक्षकांच्या नोंदवहीत नाही. आगारात गोळी झाडली जाते, तरी त्याचा आवाज कोणालाही येत नाही. मृतदेहाचा दुर्गंध येईपर्यंत कोणत्याच कर्मचाऱ्याला या घटनेची माहिती नव्हती. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ प्रतिनिधीने निगडी, पिंपरी आणि भोसरी या बस आगारांची गुरुवारी (ता. १) रात्री प्रत्यक्ष पाहणी केली. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.