PMP Bus
sakal
पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळामधून (पीएमपीएमएल) लिपिक पदाच्या तब्बल ३९० जागा रिक्त आहेत. गेली अनेक वर्षे ही पदे भरली नसल्यामुळे पीएमपीएमएलच्या अंतर्गत कामकाजाबरोबरच प्रवासी सेवेवरदेखील विपरीत परिणाम होत आहे. प्रशासन या रिक्त जागा कधी भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.