पुणे : पोलिसांच्या तत्परतेने वाचले २० रुग्णांचे प्राण

Oxygen
OxygenCanva

कोथरुड : वाढती रुग्णसंख्या आणि ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याच्या घटना देशभर सातत्याने घडत आहेत. अशीच दुर्घटना पुण्यातही घडली असती परंतु कोथरुड पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वीस रुग्णांचा जीव वाचला. त्यामुळे पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळी ८-३० च्या सुमारास पौड रस्त्यावरील कृष्णा हॉस्पिटलमधील ऑक्सिजनचा साठा संपत आल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांनी कोथरुड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक मेघशाम डांगे यांना आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्याचे कळवले. यावेळी हॉस्पिटलकडे केवळ ३० ते ४५ मिनिटे पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक होता. इतर रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध नसल्याने २० रुग्ण इतरत्र हलवणेही शक्य नव्हते. तातडीने ऑक्सिजन मिळणे अशक्य झाल्याने गंभीर परिस्थिती उदभवली होती. पोलिस निरिक्षक डांगे यांनी तातडीने कोथरुड परिसरात ऑक्सिजन असणाऱ्या रुग्णालयांशी संपर्क साधला.  

Oxygen
पुण्यात कोरोनामुक्तांची संख्या वाढतेय; जाणून घ्या आजची आकडेवारी?

गंभीर परिस्थितीची कल्पना आल्याने सुर्यप्रभा व सह्याद्री रुग्णालयांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तातडीने ऑक्सिजनचे चार जंबो सिलेंडर उपलब्ध करुन दिले. हे सिलेंडर उपलब्ध झाल्याने काही काळाचा दिलासा मिळाला तरी संकट पुर्णपणे टळले नव्हते. हे सिलेंडर फार काळ पुरणार नसल्याची कल्पना पोलिस निरिक्षक डांगे यांनी पोलिस उपआयुक्त पौर्णिमा गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे यांना कळवले. वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार शिवाजीनगर येथून ड्युरा सिलेंडर आणण्याकरीता वाहन आणि क्रेन उपलब्ध करुन दिली. अखेर पुरेसा ऑक्सिजन रुग्णालयाला उपलब्ध झाल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Oxygen
किरकटवाडीत विष प्राशन करून एकाची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com