मारुंजीत गाणी लावून धिंगाणा घालणाऱ्या टोळक्याला पोलिसांकडून अटक 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

सोसायटीसमोर बेकायदेशीरित्या जमाव जमवून गाडीच्या स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा घालणाऱ्या टोळक्‍याला हटकले.

पिंपरी : सोसायटीसमोर बेकायदेशीरित्या जमाव जमवून गाडीच्या स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा घालणाऱ्या टोळक्‍याला हटकले. त्या रागातून टोळक्‍याने दोघांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माधव यशवंत काळे, निखिल भिमा बनसोडे, अथर्व मनोज मुसमोड, अभिजीत सुरेंद्र आमले, मयूर कैलास गोरे, रवींद्र अशोक गरदरे, संकेत पंढरीनाथ भगत, प्रतीक महेश ढोकचौळे अशी अटक केलेल्यांची नावे असून, आणखी तीन आरोपी फरारी आहेत. याप्रकरणी सुधीर दत्तात्रेय शिंदे (वय 29, रा. एक्‍झर्बिया टाऊनशिप, नेरे, दत्तवाडी, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली. बुधवारी (ता.16) रात्री साडेअकरा वाजता आरोपींनी मारुंजीतील एक्‍झर्बिया सोसायटीतील एका सलून दुकानासमोर बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक शांततेचा भंग केला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोना संसर्गातही फिर्यादीच्या सोसायटीच्या आवारात एकत्र जमून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्यास धोका पोहोचविला. विनाकारण गाडीचे स्पीकर लावून मोठ्या आवाजात गाणी लावून आरोपी धिंगाणा घालत होते. त्यावेळी फिर्यादीने आरोपींना हटकल्याचा याचा राग मनात धरून आरोपी माधव काळे याने फिर्यादीला हॉकी स्टीकने, तर फिर्यादीचा मित्र आकाश प्रधान यांना इतर आरोपींनी मारहाण केली. यामध्ये दोघेही जखमी झाले. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrested a gang who dancing in society at marunji