पिंपरीतील मोरवाडी येथील लालटोपी नगर येथे रिक्षात एक पुरुष जातीचे नवजात अर्भक असल्याचा प्रकार शनिवारी (ता. २७) सकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पिंपरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पिंपरी : महापालिकेच्या स्वच्छतागृहात बाळाला जन्म दिला. त्यानंतर या अर्भकाला एका रिक्षात सोडून जन्मदाती पसार झाली. या महिलेला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार मोरवाडी येथे घडला.
पिंपरीतील मोरवाडी येथील लालटोपी नगर येथे रिक्षात एक पुरुष जातीचे नवजात अर्भक असल्याचा प्रकार शनिवारी (ता. २७) सकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर पिंपरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अर्भकाला ताब्यात घेऊन यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) दाखल करण्यात आले. मोरवाडी परिसरात पोलिसांनी तपास केला. एक महिला गर्भवती होती, अशी माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी शोध घेत संबंधित महिलेकडे कसून चाैकशी केली असता बाळाला आपणच जन्म देऊन रिक्षात ठेवल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाळाची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, महिलेने हे कृत्य का केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.