
मंगेश पांडे
पिंपरी : पुणे ग्रामीण पोलिस दलात वेगवेगळ्या शाखेत काम करताना अनेक गुंतागुंतीचे तपास केले. सराईतांच्या मुसक्या आवळल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात असताना धाडी टाकल्या. पिंपरी-चिंचवड पोलिस दलात दाखल झाल्यानंतर महिला तक्रार निवारण कक्षाच्या माध्यमातून पीडित महिला तसेच त्यांचे कुटुंबीयांचे समुपदेशन करून सुमारे सत्तर कुटुंबे पुन्हा उभी केली. या कामगिरीची दाखल घेत पोलिस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले. हा प्रवास आहे, पोलिस उपनिरीक्षक प्रभावती दिलीप गायकवाड यांचा.