Pankaj Bhoyar : जिल्ह्यातील एस. पी. कार्यालयात पोलीस पाटील भवन उभारणार

पोलिस पाटील गावात सलोखा राखण्याचा प्रयत्न करतात. पोलिस आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वयकाची भूमिका पोलिस पाटील बजावत असतात.
Pankaj Bhoir
Pankaj Bhoirsakal
Updated on

भोसरी - पोलिस पाटील गावात सलोखा राखण्याचा प्रयत्न करतात. पोलिस आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वयकाची भूमिका पोलिस पाटील बजावत असतात. त्यामुळे जिल्हा स्तरावर एस. पी. कार्यालयात पोलिस पाटील भवन उभारले जाणार आहे. त्याची सुरूवात वर्ध्याचा पालक मंत्री म्हणून वर्ध्यातून होणार असल्याचे गृह ग्रामीण, गृह निर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी भोसरीत व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाद्वारे भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय आदर्श पोलिस पाटील पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

या वेळी आमदार महेश लांडगे, बाबाजी काळे, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, खेडचे कृषी उपबाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेचे संस्थापक भिकाजी पाटील, अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण साळुंके, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, खजिनदार निळकंठ थोरात, महिला आघाडीच्या तृप्ती मांडेकर आदिंसह राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांसह पोलिस पाटील उपस्थित होते.

राज्यमंत्री भोयर पुढे म्हणाले, 'पोलिस पाटिल यांना आर्थिक पाठबळ देण्य़ासाठी पोलिस पाटीलांचे भरघोस मानधन वाढविण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी केले आहे. पोलिस पाटील यांनी कोणत्याही समस्या घेऊन मंत्रीमंडळात आल्यास त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मी मंत्री म्हणून शेवटपर्यंत पोलिस पाटील संघटनेच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहीन.'

या वेळी राज्यभारातून आलेल्या आदर्श पोलिस पाटील यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाद्वारे सरकारकडे विविध मागण्या करण्यात आल्या. यामध्ये पोलिस पाटलांचे वयोमर्यादा ६० वरून ६५ करणे, एस. पी. कार्यालयात पोलीस पाटील भवन उभारणे, निवृत्तीनंतर दहा लाख अथवा पाच हजार रुपये निवृती वेतन, पोलिस पाटलांचे दर दहा वर्षांनी होणारे नुतनीकरण बंद करणे, शासनाकडून पोलिस पाटलांच्या कुटुंबियांना मोफत आरोग्य सेवा देणे, पोलिस पाटलांच्या रिक्त जागा तातडीने भरणे, पोलिस पाटलांचे प्रलंबित असलेले भत्ते तातडीने देणे, शेजारच्या गावचा भार सांभाळणाऱ्या पोलिस पाटलांना अतिरिक्त मनधन देणे या मागण्या करण्यात आल्या. या वेळी या मागण्या राज्य शासनाद्वारे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही गृह ग्रामीण, गृह निर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या वेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com