शेवटी कोण नाही कोणाचं, आजोबा आले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

हडपसरमधील एका वृद्धाश्रमात ते होते असे समजते. कोरोना व लॉकडाउनमुळे वृद्धाश्रम बंद पडला आणि कोणीतरी त्यांना निगडी पोलिस चौकी परिसरात आणून सोडले. दिवसभर उपासमारीमुळे ते निपचित पडून होते.

पिंपरी- गेल्या काही दिवसांपासून एक निराधार आजोबा शहरात भटकत आहेत. ऐकायला कमी येते, नीट बोलता येत नाही, अशी त्यांची स्थिती आहे. निगडी पोलिसांनी त्यांना निवारा केंद्रात आणले आहे. आता सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आजोबांची माहिती व फोटो पाठविले आहेत. आपले आडनाव नायडू आहे, एवढेच आजोबा सांगतात.

हडपसरमधील एका वृद्धाश्रमात ते होते असे समजते. कोरोना व लॉकडाउनमुळे वृद्धाश्रम बंद पडला आणि कोणीतरी त्यांना निगडी पोलिस चौकी परिसरात आणून सोडले. दिवसभर उपासमारीमुळे ते निपचित पडून होते. अखेरीस पोलिसांना ही माहिती समजताच त्यांनी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार झाल्यावर राहण्याची नेमकी सोय कुठे करावी? असा प्रश्‍न पोलिसांसमोर आला. नंतर त्यांनी ‘रिअल लाइफ रिअल पीपल’ संस्थेच्या अध्यक्ष एम. ए. हुसेन यांच्याशी १२ डिसेंबर २०२० ला संपर्क साधला. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील कार्यकर्ते महादेव बोत्रे, कुंडलिक आमले आणि रविचंद ढवळे यांच्या मदतीने तत्काळ पिंपरीतील निवारा केंद्रात दाखल करून घेतले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

निवारा केंद्रात राहण्याची सोय
तेथे आधी कोविड चाचणी करून घेतली. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आता पायांवर सूज येत असल्याने औषधोपचार सुरू आहेत. कुटूंबियांनी वाऱ्यावर सोडले असतले तरी त्यांच्या निवाऱ्याची सोय झाली आहे. कुटूंबिय किंवा नातेवाईकांची माहिती उपलब्ध न झाल्यास ‘सावली’ निवारा केंद्रात त्यांचा कायमस्वरुपी सांभाळ केला जाईल, असे हुसेन यांनी सांगितले.

''चंद्रकांत पाटलांनी पुन्हा कोल्हापूरला येऊन दाखवावं''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police search operation to find the family members of the grandfather