esakal | विनापरवाना वृक्षतोड केल्यास  पोलिसांकडूनही होणार कारवाई 
sakal

बोलून बातमी शोधा

विनापरवाना वृक्षतोड केल्यास  पोलिसांकडूनही होणार कारवाई 

पिंपरी-चिंचवड शहरात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विनापरवानगी वृक्षतोड होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांनी विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

विनापरवाना वृक्षतोड केल्यास  पोलिसांकडूनही होणार कारवाई 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विनापरवाना वृक्षतोड केल्यास पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत वृक्षतोड करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना दिले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवड शहरात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विनापरवानगी वृक्षतोड होत आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांनी विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिस ठाणे हद्दीत विनापरवाना वृक्षतोड करत असल्यास सीआरपीसी 152 महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 कलम 20 (क) अनव्ये प्रतिबंध करून योग्य ती कारवाई करावी, असे आदेश पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व वरिष्ठ निरीक्षकांना दिले आहेत.

Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये 113 नवीन रुग्ण