pcmc election ncp and bjp
sakal
- जयंत जाधव
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता महायुतीतच कशी राहील, यादृष्टीने वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय हालचाली होत आहेत. शहरात महाविकास आघाडीला राजकीय जागा मिळू नयेत म्हणून सध्या भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत असल्याची प्रतिमा निर्मिती (नरेटिव्ह) सिद्ध करण्यात महायुतीला बऱ्याच अंशी यश आल्याचे दिसते; तर निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष सत्तेच्या जवळ आले तरी एकमेकांना पाठिंबा देऊन महायुतीच सत्तेत येईल, अशी परिस्थिती आहे.