देहू-आळंदी मार्गावर वारकरी व पादचाऱ्यांसाठी बनविलेल्या विश्रांती स्थळांची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 December 2020

मोशी : देहू-आळंदी या रस्त्यावरील वारकरी व पादचारी यांसाठी बनविलेल्या विश्रांतीस्थळांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या सुंदर अशा बीआरटी मार्गाला अवकळा आली आहे. वारकरी, पादचारी तसेच स्थानिक नागरीकांमधून ही विश्रांतीस्थळे दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

मोशी उपनगरांच्या पूर्वेस आळंदी तर पश्चिमेला देहू ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत. महानगरपालिकेच्या वतीने या दोन्ही तीर्थक्षेत्रांना जोडणारा तीस मीटर रुंदीचा सुंदर व प्रशस्त असा बीआरटीएस रस्ता तयार करण्यात आला आहे. 

सराफी व्यावसायिकाचा पिस्तुलातुन गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

या रस्त्याच्या दोन्ही बाजूस तीन मीटर रुंदीचे प्रशस्त असे पदपथही तयार करण्यात आलेले आहेत. या मार्गाने विशेषतः आषाढी व कार्तिकी अशा दोन्ही ही महत्त्वाच्या यात्रांदरम्यान महाराष्ट्रातील अनेक दिंड्या या दोन्ही तीर्थक्षेत्रांत कडे ये-जा करत असतात. या पालख्यांमधून पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसह पायी प्रवास करणाऱ्या पादचारी नागरिकांनाही काही ठराविक अंतरावर विश्रांती घेता यावी यासाठी सुंदर अशी विश्रांती स्थळे तयार करण्यात आलेली आहेत. याठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी व गाथा यामधील अभंगांच्या काही ओव्या असलेले सुंदर असे फलकही येथे उभारण्यात आलेले आहेत. त्याच्याजवळ वारकर्‍यांना बसण्यासाठी सुंदर असे ग्रॅनाइटचे बाक तयार करण्यात आलेले आहेत.

सध्या मात्र या विश्रांती स्थळांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याठिकाणी मोठमोठ्या आकाराची झाडेझुडपे वाढलेली आहेत. गेल्या कित्येक महान्यांपासून येथे स्वच्छताही करण्यात आलेली नसल्याने येथे अक्षरश: दुर्गंधी सुटलेली आहे. विश्रांतीस्थळाजवळील काही बांधकाम प्रकल्पांवर ये-जा करणाऱ्या मालवाहू वाहनांमुळे तसेच महापालिकेच्या दुर्लक्षामुळे देहू-आळंदी या मार्गावरील या विश्रांतीस्थळांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. 

हे ही वाचा : पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

त्यामुळे याठिकाणी वारकऱ्यांना तसेच पादचारी नागरिकांनाही विश्रांती घेणे अवघड होत आहे. त्यामुळे कार्तिकी वारीच्या निमित्ताने ही विश्रांती स्थळे दुरुस्त होणे अपेक्षित होते मात्र वारकऱ्यांसह पादचारी नागरिकांमधून पदरी उपेक्षाच पडलेली आहे.

''हवालदार वस्ती जवळ असलेल्या या विश्रांतीस्थळांवय झाडेझुडपे वाढली आहेत. बसण्याचे बाकही तुटले आहेत. महापालिकेने केलेला लाखो रुपये खर्च कचर्‍यात गेला आहे. दुरुस्ती होणे गरजेचे आहे.''
- रोहिदास हवालदार, हवालदार वस्ती, मोशी.

''संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज व श्री कानिफनाथ महाराज यांसारख्या विविध दिंड्या या रस्त्याने जातात. त्यावेळी दिंडीतील वारकरी येथील विश्रांतीस्थळांवर विश्रांती घेण्यासाठी थांबतात मात्र या विश्रांतीस्थळांची अत्यंत दुरवस्था झाली असल्याने दुरुस्ती करण्यात यावी.''
- चंद्रकांत गिलबीले, अध्यक्ष, श्री कानिफनाथ सेवा ट्रस्ट संचलित दिंडी सोहळा संचालक, मोशी.

सराफी व्यावसायिकाचा पिस्तुलातुन गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor condition of best places for Warkari and pedestrians on Dehu-Alandi road