esakal | पिंपळे निलखमधील पदपथांची अवस्था वाईट; रहिवासी म्हणतायेत चालायचं कसं?
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळे निलखमधील पदपथांची अवस्था वाईट; रहिवासी म्हणतायेत चालायचं कसं?

विशालनगर या परिसरातील प्रमुख रस्त्यावर रहिवाशांना सहजगत्या ये-जा करण्यासाठी पदपथ तयार करण्यात आले. या पदपथावरच महावितरणचे दोन मोठे ट्रान्सफॉर्मर आहेत. अवघ्या तीन फूट रुंदीच्या या पदपथाची दुरवस्था झाली आहे.

पिंपळे निलखमधील पदपथांची अवस्था वाईट; रहिवासी म्हणतायेत चालायचं कसं?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : "नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून पदपथ बनविले आहेत. मात्र, पिंपळे निलख येथील विशालनगर या रस्त्यावरील पदपथाची गेल्या पंधरा वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे. या वर्षात अनेक लोकप्रतिनिधी बदलले मात्र, अद्याप पदपथाची अवस्था 'जैसे थे' आहे. या उखडलेल्या पदपथावर चालण्याची सोय राहिलेली नाही. परिणामी हवालदिल झालेल्या पादचाऱ्यांना 'इथे आम्ही कसे चालायचे आणि असे कुठवर चालायचे?", असा प्रश्‍न स्थानिक रहिवासरी गोविंद गायकवाड यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

विशालनगर या परिसरातील प्रमुख रस्त्यावर रहिवाशांना सहजगत्या ये-जा करण्यासाठी पदपथ तयार करण्यात आले. या पदपथावरच महावितरणचे दोन मोठे ट्रान्सफॉर्मर आहेत. अवघ्या तीन फूट रुंदीच्या या पदपथाची दुरवस्था झाली आहे. समोरच म्हशीचा गोठा असल्याने नागरिकांची सारखीच रहदारी असते. मिलिटरीच्या सीमाभिंतीला लागूनच हा पथपद आहे. तरीही अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाला आहे. आता त्यावर झाडेझुडपे अन् गवत उगवले आहे. सगळा पदपथ उखडला असून, चालणे मुश्‍कील झाले आहे. विशालनगर येथील अन्य सर्व रस्त्यांच्या पदपथांची गेल्या पंधरा वर्षांत दोन वेळा दुरुस्ती केली आहे. पण हा पदपथ का वगळण्यात आला आहे? हा प्रश्‍न कायम आहे. या रस्त्यावर वाहनांची रेलचेल वाढली असून, नागरिकांना रस्त्यावरून चालणे धोक्‍याचे झाल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थानिक नागरिक रेश्‍मा मुळीक म्हणाल्या, "पदपथाचे नूतनीकरण करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी. याबाबत अनेकदा स्थानिक नगरसेवक आणि महापालिकेच्या संबंधित विभागास कळविले आहे. अद्याप कोणीही दुरुस्तीसाठी पुढे आले नाही.''