मराठा आरक्षणापर्यंत पोलिस भरती स्थगित करा; संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्यातील पोलिस शिपाई भरती स्थगित करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुधीर पुंडे व सचिव प्रवीण बोऱ्हाडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पिंपरी : मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत राज्यातील पोलिस शिपाई भरती स्थगित करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुधीर पुंडे व सचिव प्रवीण बोऱ्हाडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार गीता गायकवाड यांच्याकडे दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

संभाजी ब्रिगेडने निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील मराठा समाज आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, आरक्षण मिळणे हा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. त्यात आपण 12 हजार 538 पोलिस शिपाई भरतीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मराठा समाजातील तरुणांवर अन्याय करणारा आहे. आरक्षणाअभावी अनेक जण या संधीचा लाभ घेऊ शकणार नाहीत. यामुळे मराठा तरुणांचा हक्क हिरावून घेण्यासारखा आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने पोलिस शिपाई भरती स्थगित करावी. तसेच, आरक्षणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सरकारने कोणत्याही विभागात नोकर भरती करू नये. पोलिस भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास संभाजी ब्रिगेड राज्यभर आंदोलन करेल, याला राज्यातील महाआघाडी सरकार जबाबदार राहील, असा इशाराही ब्रिगेडने दिला आहे. तहसीलदारांना निवेदन देताना शहर कार्याध्यक्ष श्रीकांत काकडे, संघटक ईश्‍वर खंडागळे, विशाल गोरे, समाधान माने, भरत सवडे आदी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: postpone police recruitment till maratha reservation, demand of sambhaji brigade to chief minister