
Pimpri Chinchwad
Sakal
पिंपरी : शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांत खड्डे पडले आहेत. तेथून जाताना विशेषत: दुचाकी चालकांना भीती वाटावी, अशी स्थिती आहे. प्रामुख्याने रावेत, आकुर्डी, निगडी, पिंपरी, चिंचवड, सांगवी, दापोडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या भागांमध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे किरकोळ अपघात होण्यासह कोंडीचे प्रमाणही वाढत आहे. या स्थितीकडे इतके दिवस काणाडोळा करणाऱ्या पालिका प्रशासनाने आता तरी रस्त्यांची दुरुस्ती सुरू करावी, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.