
Pune News
sakal
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचा विस्तार वेगात सुरू आहे. यासाठी पिंपरी ते भक्ती-शक्ती चौक मार्गात ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. चौकाचौकात खांब उभारण्यासाठी रस्त्याच्या मधोमध लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. त्यातच खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल वाढले आहेत.